• मुखपृष्ठ
  • समालोचन
  • रचनाएँ आमंत्रित हैं
  • वैधानिक
  • संपर्क और सहयोग
No Result
View All Result
समालोचन
  • साहित्य
    • कविता
    • कथा
    • अनुवाद
    • आलोचना
    • आलेख
    • समीक्षा
    • मीमांसा
    • संस्मरण
    • आत्म
    • बहसतलब
  • कला
    • पेंटिंग
    • शिल्प
    • फ़िल्म
    • नाटक
    • संगीत
    • नृत्य
  • वैचारिकी
    • दर्शन
    • समाज
    • इतिहास
    • विज्ञान
  • लेखक
  • गतिविधियाँ
  • विशेष
  • साहित्य
    • कविता
    • कथा
    • अनुवाद
    • आलोचना
    • आलेख
    • समीक्षा
    • मीमांसा
    • संस्मरण
    • आत्म
    • बहसतलब
  • कला
    • पेंटिंग
    • शिल्प
    • फ़िल्म
    • नाटक
    • संगीत
    • नृत्य
  • वैचारिकी
    • दर्शन
    • समाज
    • इतिहास
    • विज्ञान
  • लेखक
  • गतिविधियाँ
  • विशेष
No Result
View All Result
समालोचन

Home » सैराट : संवाद (४): जयंत पवार

सैराट : संवाद (४): जयंत पवार

हिंदी के प्रारम्भिक लेखक हिंदी के साथ साथ मराठी भी जानते थे. भारतेंदु ने अपने नाटकों में मराठी का प्रयोग किया है. सरस्वती के महान संपादक महावीरप्रसाद द्विवेदी ने मराठी से हिंदी में पर्याप्त अनुवाद किये हैं.   ‘सैराट’ संवाद  भाषाओँ की सीमा से परे जा चुका है. समालोचन में यह चौथा आलेख न केवल […]

by arun dev
May 25, 2016
in Uncategorized
A A
फेसबुक पर शेयर करेंट्वीटर पर शेयर करेंव्हाट्सएप्प पर भेजें
हिंदी के प्रारम्भिक लेखक हिंदी के साथ साथ मराठी भी जानते थे. भारतेंदु ने अपने नाटकों में मराठी का प्रयोग किया है. सरस्वती के महान संपादक महावीरप्रसाद द्विवेदी ने मराठी से हिंदी में पर्याप्त अनुवाद किये हैं.  
‘सैराट’ संवाद  भाषाओँ की सीमा से परे जा चुका है. समालोचन में यह चौथा आलेख न केवल ‘मराठी मानुष’ का है बल्कि मराठी में है. इससे पहले इस पर विष्णु खरे का हिंदी में लिखा, आर. बी. तायडे का अंग्रेजी में तथा कैलाश वानखेड़ेका हिंदी में लिखा आलेख पढ़ चुके हैं. समालोचन इस तरह से हिंदी-मराठी सहयोग का भी मंच बन चुका है.
मराठी जानने और हिंदी में लिख सकने वाले पाठक  आलेख के हिस्सों का अनुवाद टिप्पणी में दे तो और बेहतर रहेगा.
प्रेक्षक का \’\’सैराट\’\’ झाले असावेत?                                      
(क्या दर्शक \’\’सैराट\’\’ हो जाएँ ?)
____________________
जयंत पवार 


काल एक सामाजिक कर्तव्य केलं. नागराज मंजुळेचा \’सैराट\’ पाहिला. एखादा महत्त्वाचा सिनेमा पाहायचं राहून जातं अनेकदा.त्याविषयी कोणी मुद्दाम पृच्छा करत नाही. पण \’सैराट\’ प्रदर्शित झाल्यापासून लोक एकमेकांना विचारताहेत, \’सैराट\’ पाहिला का? जणू तो बघणं हे तुमचं कर्तव्य आहे, असा विचारण्यामागचा सूर असतो. त्यामुळे हा सिनेमा बघणं एक सामाजिक कर्तव्य बनलं होतं. ते काल पार पाडलं.

मी सिनेमा बघितला तो उपनगरातल्या एका मल्टिप्लेक्समध्ये. थिएटर निम्म होतं आणि गाण्याला लोक नाचत नव्हते. त्यामुळे सिनेमा नीट बघता आला. अर्थात सिनेमा बघत असताना लोक तो कसा बघताहेत हा देखील एक बघण्याचा भाग असतो. थिएटरात काही अमराठी लोक होते. अर्थातच बरेच मराठी होते आणि त्यांचं अनेक जागांना दाद दिल्यासारखं आलेलं हसू कानी पडत होतं. शेवट झाल्यावर काही जण डोळे पुसत बाहेर पडत होते. सोशल नेटवर्कवर या सिनेमाबद्दल आणि विशेषतः त्याच्या शेवटाबद्दल इतकं लिहिलं गेलंय की आता त्यातला शॉक एलिमेंट निघून गेलाय. पण त्याचा एक उलटा परिणामही झाला. शेवटाकडचा भाग बघताना, आता आपला शेवट आला असं एखाद्याला वाटल्यावर त्याचं जे होईल तशी काहीशी माझी अवस्था झाली. \’कॅफे मद्रास\’ सिनेमात बॉम्बस्फोट होण्यापूर्वी तो बॉम्ब कमरेला बांधून निघणारया दहशतवादी मुलीला वस्त्रं नेसवली जातात, तेव्हा सगळे आवाज दिग्दर्शकाने म्यूट केले आहेत. जणू तो एक भयानक सोहळा चालला आहे. लग्न करून परक्या घरी निघलेल्या मुलीची पाठवणी करताना केल्या जाणाऱ्या तयारीप्रमाणे. तो बघताना जशी कालवाकालव होते, तशी इथे झाली. आधीच्या प्रेक्षकांप्रमाणे मी बेसावध पकडला गेलो नाही. त्यामुळे हादरलो नाही, पण गुदमरलो.

एकूण चित्रपट त्याच्या गुणदोषांसकट आवडला. खरंतर त्याचे जितके गुण सांगावेत तितकेच किंवा अधिक त्याचे दोष सांगावे लागतील. किंबहुना संपूर्ण सिनेमा बघितल्यावर हा मराठीतला सवौत मोठा ब्लाकबस्टर कसा काय झाला बुवा, असा प्रश्न पडला. अतिशय पसरट मांडणी आणि नेमकेपणाच अभाव हा कलात्मकतेत अडसर ठरणारा सर्वात मोठा दुर्गुण या सिनेमात चिकटलेला आहे. आणि कलाकृतीचा कालावकाश कमी होण्याच्या आजकालच्या काळात \’सैराट\’ची तीन तासांची लांबी हा चिंतेचा आणि प्रेक्षकांच्या सहनशक्तीची कसोटी बघणारा विषय ठरू शकला असता. तरीही यावर मात करून प्रेक्षकांनी तो पाहिला, एंजॉय केला आणि अनुभवला. हा एक चमत्कार वाटावा असाच अनुभव आहे. हा चमत्कार केवळ मार्केटिंगमुळे शक्य होईल असं वाटत नाही. केवळ एका दिग्दर्शकाला ब्रॅण्ड व्हॅल्यू प्राप्त झाली म्हणून होईल, असंही वाटत नाही. \’सैराट\’च्या यशाची कारणं काय आहेत, याचा शोध अनेकांना अनेक अंगांनी घ्यावा लागेल. त्याची कारणं कलाकृतीत आणि कलाकृतीच्या बाहेरही आहेत. एखादा प्रादेशिक सिनेमा जेव्हा उत्पन्नाचे सगळे विक्रम तोडून उभाआडवा पसरत जातो आणि त्याच्या लोकप्रियतेची साथ वाऱ्याच्या वेगाने फैलावते तेव्हा त्या यशाचा अर्थ शोधावा लागतो. त्यातून सिनेमाच्या मोठेपणाची कारणं कदाचित हाताला लागणार नाहीत, किंबहुना जी लागतील ती फसवीच असतील पण समाजाच्या एका मोठ्या भागाच्या अभिरुचीची, बदलत्या संवेदनांची दिशा कळू शकेल. 
\’सैराट\’ बघताना मला त्यातल्या लक्षणीय वाटलेल्या काही मोजक्या गोष्टी म्हणजे रचलेल्या संवादांचा पूर्ण अभाव. ते वास्तवात जसे झडतील तसेच ठेवणं. त्यामुळे ते बोलण्याची रीतही अघळ पघळ, अस्पष्ट आणि बहुजनी वळण्णाची. प्रमाणभाषेचं व्याकरण मोडणारी. वाक्यरचनेतला तर्क झुगारणारी. नायकाच्या सोबत असलेल्या त्याच्या दोन फाटक्या मित्रांचं अस्सल व्यक्तिरेखाटनही बघण्यासारखं आहे. यातला लंगड्या तर फारच भारी. तो साकारणाऱ्या कलाकाराची अदाकारी जबरदस्त आहे. दोन दृश्यांत लंगड्याच्या समोरून किंवा पार्श्वभागी कोणी दुसरा लंगडा माणूस सरकताना दिसतो. एका सीनमध्ये बुटका समोरून येतो. हे सामान्य दरिद्री माणसांचं पंगूपण, असहाय्यता चिन्ह बनून पसरत राहातं. सिनेमा फॅण्टसीकडून वास्तवाकडे क्रमशः सरकत येतो. पहिल्या भागातल्या परीकथेतही दिग्दर्शक नायकाच्या आणि नायिकेच्या मागे असलेला वास्तवाचा पदर घट्ट धरून ठेवतो. त्यातून पेरलेले अर्धनागर ग्रामीण व्यवस्थेतले जातीय संदर्भ नीट पोचतात. पाटलाचा पोर  लोखंडे नावाच्या दलित शिक्षकाच्या कानाखाली आवाज काढतो, त्याचं बापाला कौतुक वाटतं. हाच लोखंडे पर्शाला म्हणतो, तू झोपलास ना तिच्याबरोबर (पाटलाच्या पोरीबरोबर), मग दे सोडून. त्यांनी पण हेच केलं. हे जातीय संदर्भ ठळकपणे येणं ही देखील कदाचित प्रेक्षकांना सुखावणारी गोष्ट असेल. यात रूपवान नसणाऱ्या, अभावात जगणाऱ्या तरुण तरुणींचं रोमँटिक आयुष्य वास्तवाच्या जवळ जात त्यातला रोमँटिसिझम, हिरोइझम गोंजारतं. आजवरच्या पडद्यावरच्या प्रेमकथांतले नायक-नायिका तरुणाईला सुखावून गेलेही असतील, पण इथे प्रेक्षकांतले पर्शा, आर्ची, लंगड्या. सल्लू, आनी पडद्यावरच्या पात्रांत स्वतःला पाहतात. त्यांच्या भोवतालचं वास्तव असंच हिंसक, निर्दयी आणि अभावाने भरलेलं आहे. त्यात ते जगण्याचे दिलासे शोधतात. त्यांच्या परीकल्पना आणि वास्तव दोन्ही \’सैराट\’ने समोर ठेवलंय आणि हळूच भविष्याच्या चित्राची गुंडाळीही उलगडलीय. या देशातल्या सर्वसामान्य युवक-युवतींचं जगणं एका तीन तासांच्या कॅप्सुलमध्ये बंद करून नागराज मंजुळेने आपल्यासमोर ठेवलंय.
या संपूर्ण सिनेमाला बहुजन संस्कृतीचं अस्तर आहे, ज्याच्यामुळे सिनेमात बहुसंख्यांना आपला आवाज ऐकू येतो. सिनेमा आपलंच एक सौंदर्यशास्त्र रचत जातो. जे अभिजनांना किंवा कलात्मकतेचा अभिजनी संस्कार असणाऱ्यांना खोटं, सोयीचं आणि नीरस वाटू शकतं. या सिनेमाला ठाशीव आणि घडीव आकार नाही. वाहणाऱ्या ओढ्यासारखा तो कसाही जात राहतो, पण त्याला स्वतःची गती आहे आणि स्वाभाविकता आहे. 
हा सिनेमा बघायला आलेला बहुजन तरुण प्रेक्षक राज्यातल्या लहान मोठ्या थेटरात घुसला आणि गाण्यांवर पैसे फेकत नाचला. आपण मोठ्या शहरातल्या मल्टिप्लेक्सेसमध्ये जाऊन तिथल्या थेटरात सीटवर उभं राहून नाचू शकतो, तिथे आता उच्चभ्रू नाहीत तर आपल्यासारखेच लोक अधिक संख्येने असणार, त्यामुळे पायात स्लिपर असली तरी तिथे बिचकून राहायचं कारण नाही, दणकून नाचायचं, हा एक वेगळाच कॉन्फिडन्स या सिनेमामुळे त्याला मिळाला. हा आपला चेहरा दाखवणारा आणि आपल्याच आवाजात बोलणारा सिनेमा आहे, ही जाणीव \’सैराट\’ने त्याला त्याच्या नकळत दिली आणि तो बेभान झाला असावा. 
ही आणि अशी अनेक कारणं \’सैराट\’च्या सुसाट यशामागे सुप्तावस्थेत असावीत. \’सैराट\’चं यश हे त्याच्या कलात्मकतेत  कमी आणि त्याच्या आत आणि बाहेर असलेल्या अशा काही समाजशास्त्रीय गोष्टींमध्ये अधिक आहे. 
आता याच्यापुढे बहुजन संवेदनेच्या कलाकृतींपुढची जबाबदारी वाढली आहे. त्यात कप्पेबाज मांडणी करणं सोयीचं असलं तरी वास्तवाच्या सुलभीकरणावाचून त्यातून काही निष्पन्न होणार नाही. जातवास्तवाची आता उघड उघड मांडणी लोकांना हवी आहे. ती त्यांची गरज बनते आहे असं दिसतं. आणि हे वास्तव गुंतागुंतीचं आहे. वास्तवाचाच वेध घ्यायचा तर पाटलाची खलनायकी नेहमीच उपयोगाला यायची नाही. \’ख्वाडा\’ आणि \’सैराट\’मधल्या चित्रणाने मराठा जातीतला काही वर्ग दुखावला असेल तर अशी जातीय अस्मिताही उपयोगाची नाही. कारण त्यातलं चित्रण खोटं नाही. ज्याप्रमाणे ब्राह्मणांवरील टीका ब्राह्मणांतल्या समंजस आणि पुरोगामी वर्गालाही एक समजदारी दाखवून झेलावी/ सहन करावी लागेल तशीच टीका मराठा वर्गालाही झेलावी लागेल. त्याला गत्यंतर नाही. ही झेलतच या जातीला आपल्यातला ताठरपणा कमी करत आणि स्वतःला सुधारत पुढे जावं लागेल. पण त्याच बरोबर हेही खरं नव्हे की अन्य जाती या शोषितच आहेत. 

शोषणकर्ते त्यांच्यातही आहेत. ते सर्व जातींत आहेत. प्रत्येक जात आपल्या खालच्या जातीला पाण्यात बघत असते आणि सोयरिकीचा विषय आला की पाशवी होते. ऑनर किलिंग प्रत्येक जातीत होतं आहे आणि अशी असंख्य उदाहरणं या महाराष्ट्रात घडलेली आहेत. आणि पुरुषसत्ताकतेने तर अगदी तळातल्या जातीलाही ग्रासलेलं आहे. तळाच्या जातीतली स्त्री ही सर्वाधिक शोषित आहे. त्यामुळे बहुजन कलावंतांना यापुढे वास्तवाला भिडताना शोषणाच्या या आतल्या पदरांना धीटपणे भिडावं लागेल. असं भिडताना प्रत्येक जातीच्या अस्मिता जाग्या होऊन त्या कलाकृतींचा गळा घोटायला कदाचित मागेपुढे बघणार नाहीत. पण या सेन्सॉरशीपचं आव्हान बहुजन लेखक कलावंतांना घ्यावंच लागेल. \’सैराट\’ने हे आव्हान घेतलेलं नाही पण पुढची दिशा मात्र स्पष्ट केली आहे. दुसरा कोणीतरी आपल्यावर अन्याय करतो हे वास्तव सोयीचं असतं पण आपणच आपल्या माणसावर अन्याय करतो हे दाखवणं सोपं नसतं, पाहाणं सोयीचं नसतं. पण मानवता जागवण्याची तीच वाट असते. 

\’फॅण्ड्री\’तल्या जब्याने फेकलेला दगड किंवा आर्ची-पर्शाच्या मुलाची रक्तात भिजलेली घराबाहेर पडणारी पावलं आपल्या जिव्हारी लागली असतील तर कलाकृतीतल्या कलात्मकतेच्या चर्चेपेक्षा ती मोठी गोष्ट आहे. पण या दगडाची आणि पावलाची पुढची दिशा टिपणं अधिक अवघड आहे.
(महाराष्ट्र टाइम्स के वेबसाइट पर भी प्रकाशित, आभार के साथ)

______

जयंत पवार मराठी के शीर्षस्थ कथाकार, नाटककार तथा नाट्य समीक्षक हैं. उनके नाटकों के अनुवाद और मंचन हिंदी में भी हुए हैं. हिंदी में उन्हें राजकमल ने प्रकाशित किया है. कहानी के लिए साहित्य अकादेमी से पुरस्कृत हैं. टाइम्स ऑफ़ इंडिया के मराठी दैनिक \’महाराष्ट्र टाइम्स\’ में वरिष्ठ पत्रकार हैं.
pawarjayant6001@gmail.com
___

विष्णु खरे के  आलेख के लिए यहाँ क्लिक करें
हिंदी में इसका अनुवाद यहाँ पढ़ें – दर्शक क्यों ‘सैराट’ हुए होंगे?      
ShareTweetSend
Previous Post

सैराट : संवाद (३): कैलाश वानखेड़े

Next Post

सैराट – संवाद : (५) : दर्शक क्यों ‘सैराट’ हुए होंगे?

Related Posts

सहजता की संकल्पगाथा : त्रिभुवन
समीक्षा

सहजता की संकल्पगाथा : त्रिभुवन

केसव सुनहु प्रबीन : अनुरंजनी
समीक्षा

केसव सुनहु प्रबीन : अनुरंजनी

वी.एस. नायपॉल के साथ मुलाक़ात : सुरेश ऋतुपर्ण
संस्मरण

वी.एस. नायपॉल के साथ मुलाक़ात : सुरेश ऋतुपर्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

समालोचन

समालोचन साहित्य, विचार और कलाओं की हिंदी की प्रतिनिधि वेब पत्रिका है. डिजिटल माध्यम में स्तरीय, विश्वसनीय, सुरुचिपूर्ण और नवोन्मेषी साहित्यिक पत्रिका की जरूरत को ध्यान में रखते हुए 'समालोचन' का प्रकाशन २०१० से प्रारम्भ हुआ, तब से यह नियमित और अनवरत है. विषयों की विविधता और दृष्टियों की बहुलता ने इसे हमारे समय की सांस्कृतिक परिघटना में बदल दिया है.

  • Privacy Policy
  • Disclaimer

सर्वाधिकार सुरक्षित © 2010-2023 समालोचन | powered by zwantum

No Result
View All Result
  • समालोचन
  • साहित्य
    • कविता
    • कथा
    • आलोचना
    • आलेख
    • अनुवाद
    • समीक्षा
    • आत्म
  • कला
    • पेंटिंग
    • फ़िल्म
    • नाटक
    • संगीत
    • शिल्प
  • वैचारिकी
    • दर्शन
    • समाज
    • इतिहास
    • विज्ञान
  • लेखक
  • गतिविधियाँ
  • विशेष
  • रचनाएँ आमंत्रित हैं
  • संपर्क और सहयोग
  • वैधानिक